Tuesday, July 15, 2014

दिल इ नादान....!



दिल इ नादान तुझे हुआ क्या है ?
बता तेरी खता क्या है ?
कैसे समझाए इस मासूम को,
के इसे हुआ क्या है.....?

कम्बख्त ,खुद तो जा बैठा है 
किसी और पे 
और राते हमारी 
बर्बाद कर बैठा है

समझाये तो समझाये कैसे
मनाये तो मनाये कैसे
बत्तमीज बत्तमीजी
जो कर बैठा है उससे......!

जाती है जब वो दूर
न जाने कैसी सजा देती है
रहती है वो जब पास
एक अजब सा मजा देती है

दिल इ नादान आखिर तुझे हुआ क्या है ?
जरा बता तेरी खता क्या है ?

                                                                            :© कवीश्वर-अभिजित

Friday, July 11, 2014

बघ माझी आठवण येते का ....?

अनेक पुरस्कार प्राप्त जेष्ठ आणि सुप्रसिद्ध गारवा चे कवी सौमित्र अर्थात किशोर कदम 
ह्यांच्या एका गाजलेल्या-अजरामर अशा एका कवितेच्या ओळीच्या ("बघ माझी आठवण येते का?") प्रेरणेतून !




सकाळ झाल्यावर अलगद उठ 
स्वतःला,तुझ्या त्या गुंतलेल्या केसांना सावर 
गालेरित जाऊन दाटून आलेल्या त्या नभांकडे बघ 
बघ माझी आठवण येते का ? 

PC ON कर,
youtube वर login कर ,
सौमित्राचा गारवा search कर, 
तो ऐक ,ऐकता ऐकता तुझे भान हरपेन 
बघ माझी आठवण येते का ? 

आता पाऊस पडेल त्याला तू बोलवू नकोस 
तो स्वताच येईन त्याला पाहिजे तेव्हा 
माझ्या सारखा ,नकळत,हळुवार 
त्या पहिल्या पावसाच्या थेंबाला स्पर्श कर 
बघ माझी आठवण येते का ? 

किचन मध्ये जा ,
कॉफी बनव 
ती बनवता बनवता 
बाहेर पडणा-या त्या पावसाकडे बघ 
बघ माझी आठवण येते का ? 

जरा घराबाहेर पड पावसात भीज 
  तो आसुसलेला असेलच तुला त्याच्या मिठीत घ्यायला 
तुही दोन्ही हातांनी त्याला आलिंगन दे
सारे सारे काही विसरून त्याला अर्पण हो
मागचे सारे काही विसरून 
त्याच्या साथीने एक नवीन जग ,जग 
बघ माझी आठवण येते का ? 

आत्ता अचानक तू दचकशील मागे वळून पाहशील 
तर झाडावरचं एक पान अलवार  
तुझ्या त्या भिजलेल्या देहावरून सर्र करून जाईन 
तुला भास होईन माझ्या अस्तित्वाचा 
आत्ता भांबावलेल्या तुह्या त्या देहाकडे बघ 
बघ माझी आठवण येते का ? 

खरच परत एकदा बघ 
बघ माझी आठवण येते का ? 
:© कवीश्वर-अभिजित