Thursday, April 21, 2011

|| सर्वस्व नोकरीला वाहूनी ||

द्यानपीठ पुरस्कार प्राप्त जेष्ठ कविवर्य स्वर्गीय विं.दा.करंदीकर यांच्या एका सुंदर कवितेवर केलेले विडंबन
कदाचित हा लहान तोंडी मोठा घास असेन हि पण त्यांनी केलेल्या ह्या अजरामर कवितेला आणि ह्या 
कविता संग्रहाला वंदन करून सादर करीत आहे..




|| सर्वस्व नोकरीला वाहूनी ||
सर्वस्व नोकरीला वाहुनि ,घाव तिचे ते सारे झेलुनी
सांगू कसे सारे सांगू तुला ,मी सांगू कसे ह्याहुनी

ऑफिस येते खावया ,नसते बॉस ला हि का दया 
कॉम्पुटर होतो बोलका ,वेड्यापिश्या errors मधुनी

सांगू कसे रे सांगू तुला,मी सांगू कसे ह्याहुनी
होतो मनस्ताप अगतिक,चित्र सारे हे पाहुनी

माझ्या सभोवताली घालतो,नीती-तत्वांची भिंत मी
ठरते परी ते क्षितीज रे,जेव्हा आपलेच टाकती त्यास भेदुनी

जॉब करतो आम्ही मुका,दाबून आमचा हुंदका
रोज जातो चितेवरी ,ऑर्डर तुमची ती मानुनी

सांगू कसे सारे सांगू तुला ,मी सांगू कसे ह्याहुनी
होतो मनस्ताप अगतिक,चित्र सारे हे पाहुनी...




 विडंबन कर्ता "कवीश्वर"  (मूळ कविता माझ्या घरी मी पाहुनी                                             कवितासंग्रह "जातक":मूळ  कवी स्वर्गीय विं.दा.करंदीकर)
                                           
 

                                                                                                       

Sunday, April 17, 2011

विसरशील का तू...?



विसरशील का तू...?

विसरशील का तू 
ती ८:१२ ची ट्रेन 
त्यात फुललेलं
तुझं-माझं प्रेम...

विसरशील का तू 
तू तो फर्स्ट क्लास चा डब्बा 
तुझीच वाट पाहत
राहायचो मी उभा

विसरशील का तू 
यायचीस तू धावत पळत 
तुझं हात माझ्या हातात 
द्यायचीस नकळत 

विसरशील का तू
लोकांच्या त्या भिर-भिर्त्या नजरा 
जेव्हा माळायाचो मी 
 तुझ्या केसात गजरा 

                                                                      विसरशील का तू...................