Sunday, February 26, 2012

का फक्त महाराष्ट्रातच



का फक्त महाराष्ट्रातच
वाजू दे मराठीचा डंका 
वाजेन तो सर्वजगी 
आता नसे ह्यात शंका

: © कवीश्वर:अभिजित

Wednesday, February 15, 2012

मतदान:तू



 ठेवून भान आज तू 
भरून जोश मनात तू
ठेवून होश डोक्यात तू
कर आज मतदान तू

: © कवीश्वर:अभिजित

Saturday, February 4, 2012

तू-तू...!


तनात तू
मनात तू
ध्यानी मनी
स्वप्नात तू
आकाशी ता-यात तू
ता-यांच्या तेजात तू

दारात तू
अंगणात तू
अंगणाच्या वेलीत तू
वेलीच्या पानात तू
पानाच्या तू
फुलात तू

गंधात तू 
सु-गंधात तू 
रेशमी बंधात तू
मलमली तारुण्यात तू
सूर्याच्या किरणात तू
चांदण्याची चांदरात तू 


: © कवीश्वर:अभिजित