Thursday, March 31, 2011
तुझे अस्तित्व जणू .......
|| तुझे अस्तित्व जणू ||
तुझे अस्तित्व जणू
रातराणीचा सुवास
हवा हवासा वाटे
तुझा सहवास
तुझे अस्तित्व जणू
परिसाचा स्पर्श
लाभता मनास
होई असा ग हर्ष
तुझे अस्तित्व जणू
शरदाच चांदणं
माझ काळीज त्याला
दिलं आंदण
तुझे अस्तित्व जणू .......
क्रमशः
Friday, March 18, 2011
|| ऐसा बाजीराव||
आयुष्याची फक्त
चाळीशी जगलेला
लढलेला प्रत्येक
संग्राम जिंकलेला
|| ऐसा बाजीराव||
मस्तानी वरी भाळलेला
दिल्लीचेहि तख्त फोडलेला
सारा हिंदुस्तान
ज्याच्या समोर झुकलेला
|| ऐसा बाजीराव||
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)