नमोस्तुते रेणुका देवी
यल्लम्मा देवी नमोस्तुते
आदिमाया सौंदती निवासिनी
कुलदेवी तुजं नमोस्तुते ।।
नादिपल्याड डोंगरावरी
नादिपल्याड डोंगरावरी
रेणुका आई तू प्रस्थापिते
लल्लाटी भंडारा तुझ्या नावाचा
कुलदेवी तुजं नमोस्तुते ।।
डोळा भरून तुझ्या दर्शना
ओढ तुझी आम्हास लागते
करतो जागर तुझ्या नामाचा
कुलदेवी तुजं नमोस्तुते ।।
हाकेला धावशी ,भक्ताला पावशी
जगतजननी तू सारे जाणते
जागृत देवी संकटनिवारिणी
कुलदेवी तुजं नमोस्तुते ।।
हाकेला धावशी ,भक्ताला पावशी
जगतजननी तू सारे जाणते
जागृत देवी संकटनिवारिणी
कुलदेवी तुजं नमोस्तुते ।।
:© कवीश्वर-अभिजित