|| माझ्या मना शंढ बन ||
|| माझ्या मना शंढ बन
जे चालले ते गप्प बघ
दगडा सारखा ढिम्म बन
माझ्या मना शंढ बन
दाब मत दाब मन
येइल ते कर सहन
सदा सुखी निर्लज्ज बन
माझ्या मना शंढ बन
नको बाळगू अभिमान,
नको बाळगू स्वाभिमान
समजती लोक त्यास
हे तर तुझे गर्वगान
बर्फा एवढा थंड बन
माझ्या मना शंढ बन ||
:© कवीश्वर-अभिजित