Saturday, November 16, 2024

आत्ता राज पाहिजे..!

             आत्ता राज पाहिजे..!


अंधार जसा पडला दिवा पाहिजे

या राष्ट्राला जिजाऊचा तसा शिवा पाहीजे,


स्वाभिमानी शिवबाचा स्वराज पाहिजे,

या महाराष्ट्राला बाळासाहेबांचा राज पाहिजे,


मोडेल पण वाकणार नाही,

असा अस्सल कणा पाहिजे,

या राज्याला बाळासाहेबांचा राज पाहिजे,


पुरे झाली खोकेगीरी, पुरे झाली गद्दारी, पुरे झाली सुपारीगिरी, आत्ता अभिमानी सुराज्य पाहिजे,

या राज्याला बाळासाहेबांचा राज पाहिजे.


फोडाया मधांत तख्त एक असा अभिराज पाहिजे,

या राज्याला आत्ता बाळासाहेबांचा राज पाहिजे.


आज सबंध महाराष्ट्र तुझ्याकडे आशेने पाहतो आहे,

तो मातोश्रीचा बाळ शिवतीर्थावर लढतो आहे.


ठेचाया ठाकरी विचार,समोर कोल्ह्यांचे झुंड आहेत,

मातोश्रीचा वाघ शिवतीर्थावर लढतो आहे..!


असले समोर कसलेही प्रस्थापित,

आत्ता एकच प्रण पाहिजे

या राज्याला बाळासाहेबांचा राज पाहिजे..!!



: कवीश्वर