विसरशील का तू...?
विसरशील का तू
ती ८:१२ ची ट्रेन
त्यात फुललेलं
तुझं-माझं प्रेम...
विसरशील का तू
तू तो फर्स्ट क्लास चा डब्बा
तुझीच वाट पाहत
राहायचो मी उभा
विसरशील का तू
यायचीस तू धावत पळत
तुझं हात माझ्या हातात
द्यायचीस नकळत
विसरशील का तू
लोकांच्या त्या भिर-भिर्त्या नजरा
जेव्हा माळायाचो मी
तुझ्या केसात गजरा
विसरशील का तू...................
No comments:
Post a Comment