Thursday, September 8, 2011

स्वप्नात माझ्या तू ...

                                     
                            
स्वप्नात माझ्या तू 
सत्यात येशील का ?
डोळ्यात माझ्या तू
प्रत्यक्षात येशील का ?

पुरे झाला लपंडाव 
हा पाठशिवणीचा
समजून घे जरा तू
माझी ही विराणी 

माझा मी आक्रंदत आहे
तुला साद देत आहे
ऐकून घे जरा तू 
   माझी ही कहाणी.....

                                                      -कवीश्वर




2 comments:

Vishnu Gopal Vader said...

सखीच्या भेटीची तळमळ चांगली चित्रित झाली आहे. कविता आवडली. फक्त एकच खटकले- ‘हि’ चा इकार ‘ही’ असा- म्हणजे दीर्घ पाहिजे.कारण आपल्याला माहीत असेलच, की कवितेचा परिणाम जसा ांत:करणावर होत असतो तसाच किंबहुना थोडासा अधिकच, डोळ्यांवरही होत असतो

Abhijit said...

धन्यवाद मित्रा चूक दुरुस्त.....