Saturday, February 4, 2012

तू-तू...!


तनात तू
मनात तू
ध्यानी मनी
स्वप्नात तू
आकाशी ता-यात तू
ता-यांच्या तेजात तू

दारात तू
अंगणात तू
अंगणाच्या वेलीत तू
वेलीच्या पानात तू
पानाच्या तू
फुलात तू

गंधात तू 
सु-गंधात तू 
रेशमी बंधात तू
मलमली तारुण्यात तू
सूर्याच्या किरणात तू
चांदण्याची चांदरात तू 


: © कवीश्वर:अभिजित


No comments: