Tuesday, April 17, 2012
Friday, April 6, 2012
पाहिजे...!
पाहिजे
मुक्या माझ्या आसवांना
तुझे शब्द पाहिजे
अबोल माझ्या मनाला
तुझे बोल पाहिजे
अव्यक्त भावनांना
तुझे भाव पाहिजे
तुझ्या विरहाचा
अभाव पाहिजे
तुझ्या नामाचा
अखंड जाप पाहिजे
मलमली तारुण्याचा
मला शाप पाहिजे
तुझ्या सौंदर्याचा
झंकार पाहिजे
बेहोष यौवनाचा
अंगार पाहिजे
तुझ्या शृंगाराचा
असा साज पाहिजे
आज मला तुझ्या
डोळ्यात थोडी
लाज पाहिजे....!
तुझ्या सौंदर्याचा
झंकार पाहिजे
बेहोष यौवनाचा
अंगार पाहिजे
तुझ्या शृंगाराचा
असा साज पाहिजे
आज मला तुझ्या
डोळ्यात थोडी
लाज पाहिजे....!
- : © कवीश्वर:अभिजित
Subscribe to:
Posts (Atom)