बाजी भरला तिच्या मनात
जेव्हा पाहिलं तिने त्याला रणात
तोही भाळला मस्तानिवरी
पाहून तिची नजर करारी
पाहून ते तेज रूप
आला बाजीस हि हुरूप
तळपती त्याची ती समशेर
होता शाहूंचा तो सव्वाशेर
काय वर्णावा तिचा तो नूर
बघताच काळजात माजे काहूर
जाता बाजी रणात
मस्ताणीस लागे हुर-हुर
नव्हते का जगास
अस्तित्व दोघांचे राजी
तरी राहिले नाव अमर त्यांचे
मस्तानी आणि बाजी....
: © कवीश्वर:अभिजित