Sunday, August 10, 2014

तू असताना-तू असताना...!



न जाणले मोल तुझे
तू असताना
जातो आता तोल ही
तू नसताना
न अडला श्वास कधी 
तू असताना
अडतो आता घास ही
तू नसताना
ना लागली कधी आस तुझी
तू असताना
होतात आता भास् ही
तू नसताना
घातले कित्येक वाद
तू असताना
घालतो तुला साद
तू नसताना


                                           क्रमश:

:© कवीश्वर-अभिजित
  





No comments: