Sunday, August 31, 2014

कोणीतरी हवं....!




जीवापाड प्रेम करणारा कोणीतरी हवं 
जीव ओरबाडनारे अनेक भेटतात 

मनाला ओढ लावणारं कोणतरी हवं 
मनाला जखमा करणारे अनेक भेटतात

काळजाचा ठोका चुकवणारं कोणतरी हवं
त्याला भोक पाडणारे अनेक भेटतात

सुख:दुखात आपलसं कोणीतरी असावं
दुख देणारे अनेक भेटतात

मनाला साद घालणारं कोणीतरी हवं
वाद घालणारे अनेक भेटतात

मनाला आस लावणारं कोणीतरी हवं
दु:स्वास करणारे अनेक भेटतात



:© कवीश्वर-अभिजित









No comments: