आईच्या कुशीत दिसतो महाराष्ट्र माझा
सह्याद्रीच्या कुशीत वसतो महाराष्ट्र माझा
शेतात राबणाऱ्या हातात महाराष्ट्र माझा
डौलाने फडकणाऱ्या भगव्यात महाराष्ट्र माझा
ह्याच मातीत जन्मलेला आमचा रयतेचा राजा
असे म्हणून प्रिय आम्हाला हा महाराष्ट्र माझा.. !
-कवीश्वर-अभिजीत
No comments:
Post a Comment