Sunday, June 7, 2015

अजूनही:तु



अजूनही विश्वास आहे म्हणून 
माझा तुझ्यात श्वास आहे

अजूनही तुझी आस आहे म्हणून 
  मला तुझा ध्यास आहे 

अजूनही तुझी आशा आहे म्हणून 
माझ्या जगण्याला दिशा आहे 

अजूनही तुझ्या अत्तराचा गंध आहे 
म्हणून जगण्यास सुगंध आहे 

अजूनही मनात हूर हूर आहे 
तुझ्या नावाचं काहूर आहे 

तू आहेस म्हणून जगन्यास अर्थ आहे 
नसशील जर तूच हे जगणेच व्यर्थ आहे 

अजूनही विश्वास आहे म्हणून 
माझा तुझ्यात श्वास आहे


:© कवीश्वर-अभिजित



No comments: