मी बाप्पा बोलतोय..
मला वाजत गाजत आणलत
मनोभावे पूजा अर्चा केलीत
तसाच निरोपही दिलात
मी गावी पोहचत ही नाही की
तुम्ही माझ्यासाठी किती खर्च झाला?
उरलेले पैसे काय करणार?
प्रसाद कसा चांगला की वाईट?
मला प्रसाद उशिरा का मिळाला?
त्याला कसा लवकर मिळाला?
ह्यावर तुमच्या त्या काल्पनिक ग्रुप वर रणकंदन माजवलेत, का रे? मी ह्यासाठी आलो होतो का?
विसरलात का माझ्या आरतीत तल्लीन झालेलात?
माझ्या भक्तीत देह भान विसरून नाचलात,
बाप्पा मोलया बोलणारे तुमच्याच society मधले बोबडे बोल..
माझ्या लाडक्या भक्तांसाठी तुम्ही केलेली धडपड,
त्यांना प्रसाद देण्यासाठी केलेली लगबग,
त्यांच्या माझ्या मनोरंजनासाठी तुम्ही आयोजित केलेले
कित्येक खेळ, त्यातील विजेते , त्यातली गंमत
विसरलात का रे एवढं सगळं इतक्या लवकर??
नाही ना? मग मी गेल्या गेल्या इतके बेचैन झालात की माझा उत्सव आणि त्याचा आनंद विसरून तुम्ही हा किती चूक आणि मी किती बरोबर ह्यात तुम्ही रमलात?
काहींनी तर मलाही नाही सोडले रे , कोणी माझा उपयोग राजकारणासाठी केला तर कोणी स्वतः च्या स्वार्थापोटी केला, मी मात्र निरपेक्षपणे आशीर्वाद दोघांनाही दिले, लवकरात लवकर मनाने बरे व्हा म्हणून..
लोकमान्य टिळकांनी मला तुमच्याकडून तुमच्यासमोर आणि तुमच्यासाठी स्थापित केले आहे, ते फक्त प्रसाद खायला आणि ह्याची त्याची टिंगल करून तुमच्या घाणेरड्या राजकरण करण्यासाठी नाही तर आपण साऱ्यांनी एका छताखाली निस्वार्थ भावनेने एकत्र येऊन ह्या लोकमानसात पुढे जाण्यासाठी, माणसाला माणूस म्हणून वागवण्यासाठी.
काय चांगला काय वाईट, ही ओळण्याची ताकत फक्त मनुष्याकडे आहे, म्हणून चांगला वाइट ओळखता, करता करता, बाकी काही विसर, तुझ्यातल्या बाप्पाला विसरू नकोस..
मी दुसरा तिसरा कोणी नाही तुमचा, तुझ्यातला बाप्पा बोलतोय....
© कवीश्वर | अभिजीत.
No comments:
Post a Comment