Wednesday, November 4, 2020

बता.. बता वो लम्हा तुम्हे महसूस ना किया हो 

बता वो पल तुम्हे याद ना किया हो 

करते हे लाख ख्वाइशे तुझे पाने के लिए 

फिर सोचते हे, तुम यहाँ होती तो ऐसा होता 

तुम यहाँ होती तो वैसा होता .... ! 


                                                    :© कवीश्वर-अभिजित

Saturday, January 30, 2016

।। रेणुका नमन ।।

नमोस्तुते रेणुका देवी 
यल्लम्मा देवी नमोस्तुते 
आदिमाया सौंदती निवासिनी 
कुलदेवी तुजं नमोस्तुते ।।

नादिपल्याड डोंगरावरी 
रेणुका आई तू प्रस्थापिते 
लल्लाटी भंडारा तुझ्या नावाचा 
कुलदेवी तुजं नमोस्तुते ।।

डोळा भरून तुझ्या दर्शना 
ओढ तुझी आम्हास लागते 
करतो जागर तुझ्या नामाचा 
कुलदेवी तुजं नमोस्तुते ।।

हाकेला धावशी ,भक्ताला पावशी
जगतजननी तू सारे जाणते
जागृत देवी संकटनिवारिणी
कुलदेवी तुजं नमोस्तुते ।।


                                                                          :© कवीश्वर-अभिजित
Sunday, June 7, 2015

अजूनही:तुअजूनही विश्वास आहे म्हणून 
माझा तुझ्यात श्वास आहे

अजूनही तुझी आस आहे म्हणून 
  मला तुझा ध्यास आहे 

अजूनही तुझी आशा आहे म्हणून 
माझ्या जगण्याला दिशा आहे 

अजूनही तुझ्या अत्तराचा गंध आहे 
म्हणून जगण्यास सुगंध आहे 

अजूनही मनात हूर हूर आहे 
तुझ्या नावाचं काहूर आहे 

तू आहेस म्हणून जगन्यास अर्थ आहे 
नसशील जर तूच हे जगणेच व्यर्थ आहे 

अजूनही विश्वास आहे म्हणून 
माझा तुझ्यात श्वास आहे


:© कवीश्वर-अभिजितFriday, May 1, 2015

महाराष्ट्र माझा.!

आईच्या कुशीत दिसतो महाराष्ट्र माझा
सह्याद्रीच्या कुशीत वसतो महाराष्ट्र माझा
शेतात राबणाऱ्या हातात महाराष्ट्र माझा
डौलाने फडकणाऱ्या भगव्यात महाराष्ट्र माझा
ह्याच मातीत जन्मलेला आमचा रयतेचा राजा
असे म्हणून प्रिय आम्हाला हा महाराष्ट्र माझा.. !
-कवीश्वर-अभिजीत

Wednesday, October 1, 2014

नशा....!

दोस्त पूछते है 
क्या तूम पिते हो ?
हमने कहा हम तो 
बिना पिये ही जीते है 
अपनीही ज़िन्दगी में 
मद मस्त रहते हे 
नशा करनी ही है
तो इश्क़ की करते है 
प्यार की करते है 
वरना जाम तो 
      बुज़दिल भी पिते है …। 

-कवीश्वर-अभिजीत 

Sunday, September 28, 2014

नाही जन्मोजन्मीची......!।। नाही जन्मोजन्मीची ओळख आपली 
नाही मला तुझी जाणं 
कालच भेटलो तरी 
सांग का गुंते तुझ्यात प्राण 

दिवस सरे बघता बघता 
न सरे ती रात्र 
सांग वेडे ऐकलस का कधी 
सच्च्या प्रेमाने पहिली धर्म-जातं ?।।

                                                                                   :©:कवीश्वर:अभिजित
Saturday, September 6, 2014

पिशाच्छ तुझ्या प्रेमाचे....!पिशाच्छ तुझ्या 
प्रेमाचे छळतात
 मला अजूनही 
उकल तुझ्या
 गूढ हास्याची 
न कळली
 मला अजूनही
न कळले भाव
आहे जे तुझ्या
अंतरात अजूनही
शृंगार लेवून 
तुला पाहन्याची
इच्छा उरली 
उरात अजूनही 
हरवले ते दिवस 
तरी वाटते मनाला 
आहे ती चांदरात अजूनही 
वेड्या मनाला समजावले तरी 
होतात तुझेच भास 
आरशात अजूनही
दिलेस तू अंतर जरी
आहे तेच प्रेम माझ्या
काळजात अजूनही
जरी विसरलीस तू
द्याया प्रेमाची साक्ष तरी
पडतो प्राजक्ताचा सडा
तुझ्या अंगणात अजूनही 
पिशाच्छ तुझ्या 
प्रेमाचे छळतात
 मला अजूनही 
उकल तुझ्या
 गूढ हास्याची 
न कळली
 मला अजूनही


                                                                                 :©:कवीश्वर:अभिजित