पिशाच्छ तुझ्या
प्रेमाचे छळतात
मला अजूनही
उकल तुझ्या
गूढ हास्याची
न कळली
मला अजूनही
न कळले भाव
आहे जे तुझ्या
अंतरात अजूनही
न कळले भाव
आहे जे तुझ्या
अंतरात अजूनही
शृंगार लेवून
तुला पाहन्याची
इच्छा उरली
उरात अजूनही
हरवले ते दिवस
तरी वाटते मनाला
आहे ती चांदरात अजूनही
वेड्या मनाला समजावले तरी
होतात तुझेच भास
आरशात अजूनही
दिलेस तू अंतर जरी
आहे तेच प्रेम माझ्या
काळजात अजूनही
जरी विसरलीस तू
द्याया प्रेमाची साक्ष तरी
पडतो प्राजक्ताचा सडा
तुझ्या अंगणात अजूनही
दिलेस तू अंतर जरी
आहे तेच प्रेम माझ्या
काळजात अजूनही
जरी विसरलीस तू
द्याया प्रेमाची साक्ष तरी
पडतो प्राजक्ताचा सडा
तुझ्या अंगणात अजूनही
पिशाच्छ तुझ्या
प्रेमाचे छळतात
मला अजूनही
उकल तुझ्या
गूढ हास्याची
न कळली
मला अजूनही
मला अजूनही
:©:कवीश्वर:अभिजित
No comments:
Post a Comment